गोरगरीबांच्या अडचणीच्या काळात ढाल बनून उभे राहणार, विष्णू महेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून रुग्णसेवा करण्याचा निश्चय – प्रथमेश कोठे…

सोलापूर
स्वर्गीय महेश कोठे यांची 1 एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे स्व महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली, यावेळी प्रथमेश कोठे, पद्माकर नाना काळे, सुरेश पाटील, अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, उमेश गायकवाड, रमेश यन्नम, गुरूषांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, चंद्रकांत पवार, अक्षय वाकसे, न्यानेश्वर सपाटे, युवराज सरवदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते
यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीत सहभाग घेतला, यावेळी देवेंद्र कोठे यांनी स्व महेश अण्णा कोठे यांच्या 61 व्या जयंती निमित्त 61 ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचे सांगितले.
तर सुरेश पाटील यांनी स्व महेश कोठे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप, यासह विविध उपक्रमांनी महेश कोठे यांची जयंती साजरी करण्याचेआवाहन केले, अक्षय वाकसे यांनी 61 ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले तर युवराज सरवदे यांनी 61 कुटुंबाना धान्य वाटप करणार असल्याचे सांगितले
प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले, तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहीन अशी ग्वाही दिली
यावेळी स्व महेश अण्णा कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…