सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग नागरिकांसाठी शाप की वरदान*❓

सोलापूर
सोलापूर च्या उत्तर तहसील कार्यालय अंतर्गत उत्तर सोलापुरातील ग्रामीण साठी पुरवठा विभाग कार्यरत आहे. ह्या कार्यालयात तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानावर नियंत्रण तसेच नागरिकांचे नवीन शिधा पत्रिका, नाव कमी जास्त करणे,जीर्ण झालेल्या किंवा गहाळ झालेल्या कार्डाचे नूतनीकरण करणे तसेच रेशन दुकानातून धान्य सुविधा मिळण्यासाठी यंत्रणा आहे. आणि ह्याच कार्यालयातून नागरिकांचे काम प्रधान्याने होणे अपेक्षित असताना मात्र संबंधित अधिकार्या कडून चुकीच्या पद्धतीने काम होताना पहावयास मिळत आहे. पुरवठा विभाग हा जरी ग्रामीण भागासाठी असला तरी पुरवठा कार्यालय हे शहरात असल्याने बहुतांश नागरिकांना तालुक्यातून नाहक हेलपाटे मारावे लागत आहे.अनेक नागरिकांना आपल्या कुटूंबातील लग्न होऊन गेलेल्या, विभक्त कुटुंब किंवा मयत व्यक्ती चे नाव कमी करण्यासाठी कार्यालयात जावे लागते.
मात्र संबंधित कार्यालयात शिधा पत्रिकेतून रीतसर नाव कमी न करता कार्डात नावाची नोंदी तसेच ठेवून फक्त ऑनलाईन नाव कमी करणे तसेच कुटूंबातील प्रमुखाचे नाव दुरुस्त करणे तसेच पूर्ण नाव न घेता फक्त अर्धवट नाव नोंद करणे असे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम होत आहे.त्यानंतर नागरिकांना काम पूर्ण झाले असे सांगून दलाला मार्फत एक हजार किंवा दोन हजार रुपये इतकं आर्थिक भुरदंड माथी मारला जातो. आर्थिक पिळवणूक झालेला कार्ड धारक जेव्हा रास्त भाव धान्य दुकानात येतो तेव्हा पॉस मशीनवर चुकीचे दुरुस्ती झाल्याचे कळताच ग्राहक व दुकानदारात शाब्दिक चकमकी होत आहे.ह्या बाबतीत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊनही जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ज्यावेळी शिधा पत्रिका धारक आपल्या कार्डातील नाव कमी जास्त किंवा दुबार करण्यासाठी अर्ज दाखल करतात, त्याच वेळी त्या कार्डातील ऑनलाईन प्रक्रिया मधून दुरुस्ती होणं अपेक्षित असताना, फक्त कुटुंब प्रमुख दुरुस्त केले जात आहे.नागरिकांना आपल्या शिधा पत्रिकेतील दुरुस्ती करिता रोजंदारी बुडवून सोलापूर शहरात यावे लागते, परंतु आल्यावरही अश्या चुकीच्या पद्धतीचे कामे शिधापत्रिका माथी मारण्याचे काम संबंधित कार्यालयाकडून होत आहे.यापूर्वी ही ह्या कार्यालयात बरेच चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याचे प्रसार माध्यमातून उघडकीस आले..
मात्र आजतागायत सुधारणार झाले नसल्याने ह्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. महाराष्ट्र सह सोलापूर जिल्ह्यात ऑनलाईन प्रणाली सुधारणा होऊन सुद्धा उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग मात्र जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरत असल्याने संबंधित पुरवठा कार्यालय शिधा पत्रिका धारकांना पुरवठा शाखा हे शाप की वरदान हे कळण्यास मार्ग नाही असे चर्चेत आहे.
अश्या चुकीच्या कामाला नेमकं वरदस्त कोणाचे ❓ह्यावर कारवाई होणार का ❓भविष्यात होणाऱ्या कामात नेमकं सुधारणा होणार का ❓असा सवाल जनसामान्य शिधापत्रिका धारकांतून होत आहे.