महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी:-किसन जाधव {प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी}

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सोमवारी 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, 2047 पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सज्ज आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकास आता लांबणार नाही’ शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल. अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर केला.
आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे आमचा नेत्याने राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेसाठी समोर ठेवून मांडला आहे त्यामुळे विकास निश्चित होणार आहे