बसवेश्वरांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाबाबत बसव ब्रिगेडच्या निवेदनाची तत्काळ दखल….
आमदार विजयकुमार देशमुख ऍक्शन मोडवर : कामाला गती देण्याच्या सूचना...

सोलापूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाबाबत बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी आमदार देशमुख यांची भेट घेतल्यानंतर या निवेदनाची दखल घेत अवघ्या एक तासात आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुशोभीकरणाच्या जागेवर अधिकाऱ्यांना बोलावून कामाची पाहणी केली. बसव ब्रिगेडने पाठपुरावा केल्यामुळे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे.
सोलापूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरण कामाचा आढावा घेत हे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशा सूचना माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शनिवारी दिल्या.
शनिवारी सकाळी बसव ब्रिगेडचे शहर अध्यक्ष अमित रोडगे आणि सहकाऱ्यांनी आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून हे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार बसव ब्रिगेडने केली. माजी महापौर बंडपण्णा मुनाळे यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर आजतागायत येथे कोणतेही सुशोभीकरण झालेले नाही. तसेच जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि परिसराची सुधारणा त्वरित व्हावी अशा आशयाचे निवेदन शनिवारी सकाळी बसव ब्रिगेडकडून आमदार विजयकुमार देशमुख यांना देण्यात आले होते.
यावर तत्काळ कार्यवाही करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुशोभीकरणाच्या ठिकाणी पाचारण करीत कामाचा आढावा घेतला. तसेच काम जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. बसव ब्रिगेडने केलेल्या पाठपुराव्यामुळे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळा परिसराच्या कामाला गती मिळाली आहे.
याप्रसंगी पाहणी करताना आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, बसवब्रिगेड शहराध्यक्ष अमित रोडगे, कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, श्रीकांत कट्टीमनी, बसवराज मेलशेट्टी, चंद्रशेखर कौटगी, राजशेखर लोकापुरे, बसवराज लोहार, मल्लिनाथ नलोगल, विश्वनाथ कंनी, अमित कलशेट्टी, शिवराज तेली, संजय विजापुरे, विजय भावे, राम राजमाने, अभियंता मुन्ना तळीखेडे, अभियंता सातपुते, आर्किटेक्त मल्लिनाथ पाटील,
प्रसाद कुलकर्णी, देविदास बनसोडे,
राजेंद्र खज्जनगी, महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील, माजी नगरसेवक अमर पुदाले, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
————
कोट
सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाल्याचे समाधान
जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची आणि परिसराची निगा चांगल्या प्रकारे राखणे आवश्यक आहे. त्याकरिता येथील सुशोभीकरण अत्यंत जलद गतीने व्हावे अशी मागणी बसव ब्रिगेडकडून आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देऊन केली होती. त्यांनी निवेदनावर तत्काळ कार्यवाही करत सुशोभीकरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाल्याचे समाधान आहे.
— अमित रोडगे, शहराध्यक्ष, बसव ब्रिगेड