सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सुजित अवघडे यांनी मुंबईत घेतली भेट…
जयंती मिरवणुकीसाठी सोलापूरला येण्याचे दिले निमंत्रण...

सोलापूर
विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक महिन्यांवर आली असून ही जयंती सोलापुरात जल्लोषात साजरी होत असते. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले. तसेच या जयंतीत दोन बेस दोन टॉप लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील रमाई व बाबासाहेबांचे पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने होण्याच्या अशाचे निवेदन त्यावेळी देण्यात आले.
हे निवेदन देतेवेळी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, विजयानंद काळे , RPI आठवले गटाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ दावणे , सतीश कदम, आनंद इंगळे , राहुल कुचेकर यांची उपस्थिती होती…