पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिकास अटकपूर्व जामीन मंजूर:-ॲड .मिलिंद थोबडे….

सोलापूर
दि. सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक शंकर काशिनाथ कवठे वय 42 राहणार जेऊर तालुका अक्कलकोट याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर जे कटारिया यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत आशिकी दिनांक 16/05/2025 रोजी तक्रारदार याने मौजे हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर येथे भूमिगत गटार व सिमेंट रस्ते केले होते त्या कामाच्या एकूण विला पैकी 2,50000 हजार रुपयाचे बिल काढून देण्यासाठी क्लर्क कवठे याने पण 5000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून पोलिसांनी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये क्लर्क कवठे यांच्याविरुद्ध 28/05/2025 सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आपणास अटक होऊ नये म्हणून कवठे याने एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या व्यक्तीवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सदर गुन्ह्यास पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 50000 रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार / आरोपीतर्फे ॲड .मिलिंद थोबडे, एडवोकेट निशांत लोंढे ऍडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकार तर्फे एडवोकेट बागल यांनी काम पाहिले.