अखेर मा.जिल्हाधिकारी साहेब ह्यांच्या आश्वासना नंतर जिल्हा संघटनेचा संप मिटला….
⚜️ जिल्हा संघटनेला पहिल्या टप्यातील यश संपादन⚜️

सोलापूर
मागील काही वर्षांपासून पंढरपूर येथील बहुचर्चीत भ्रष्ट पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक ह्याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व निलंबणाची कारवाई करिता दुर्लक्ष करत असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला होता.ह्याबाबत सोलापूर जिल्हा संघटनेने मा.उपायुक्त साहेब पुरवठा पुणे विभाग,मा.जिल्हा पुरवठा अधिकारी ,अन्नधान्य वितरण अधिकारी साहेब ह्यांना निवेदनातून संपाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजरोहाणानंतर जिल्हाधिकारी मा.कुमारजी आशीर्वाद ह्यांनी जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व शिष्ट मंडाळासोबत बैठक घेऊन मुख्य तक्रार जाणून घेत सदानंद नाईक ह्याचा तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे ह्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.अहवाला नंतर दोषी अढळल्यास विभागीय चौकशी व निलंबणाची कारवाई असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकारीना महाराष्ट्र भर चाललेल्या सर्वर डाऊन मुळे आधीच अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहे,त्यांना पुन्हा वेठीस धरू नका अश्या सूचना देत संप माघार घ्यावी असे कळविले. दस्तुरखुद्द मा.जिल्हाधिकारी साहेब ह्यांच्या आदेशाला मान्य करत, सोलापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपातील मुख्य उदीष्ठा पैकी सर्वप्रथम *प्रशासनाचे लक्ष वेदल्याने* पहिल्या टप्प्यातील यश मिळाल्याचे समाधान व्यक्त करत,जिल्ह्यात दुपार नंतर धान्य वाटपाला पुन्हा सुरुवात झाले आहे.सोलापूर शहरात शंभर टक्के बंद पाळला असून इतर तालुक्यातून तूरळक वाटप सुरु होते.जिल्हा संघटनेच्या आवाहन संप मिटल्याचे आवाहन करताच दुपार नंतर वाटपास जोरदार सुरुवात करण्यात आले.ह्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मा.संतोषजी सरडे साहेब व अन्नधान्य वितरण अधिकारी मा.ओंकारजी पडोळे साहेब ह्यांच्या मध्यस्थिने संप मिटल्याचे घोषित करण्यात आले.ह्याप्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, पंचकमिटी शिवकुमार दादा चकोले, बापू साहेब गंदगे,शिवशंकर कोरे मामा ,जिल्हा उपाध्यक्ष वहाबचाचा शेख,उमेश आसादे,जिल्हा सचिव राज कमटम,राजशेखर जवळे,बसवराज बिराजदार, वसीम शेख,पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप पावले, जिल्हा संघटक समाधान रोंगे सह सर्व जिल्हा व तालूका पदाधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.