सुसंस्कार पिढी घडविण्यासाठी श्री संत सावता महाराज वारकरी संस्थेचा प्रामुख्याने पुढाकार…
संस्थेच्या वतीने आयोजित मृदंग वादन प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी दाखवले कला कौशल्य...

सोलापूर
आजची उज्वल पिढी घडविण्यासाठी श्री संत सावता महाराज वारकरी संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी मृदंग वादन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.या निमित्त मुलांच्या कला कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला.या बाल वयापासूनच मुलांमध्ये आध्यात्म्याची आवड निर्माण व्हावी यातूनच उद्याचा नवोदित कलाकार निर्माण व्हावा.या हेतूने श्री संत सावता महाराज संस्थेने घेतलेल्या स्तुत्य अश्या उपक्रमाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी विशेष कौतुक केले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस शेखर फंड,हिंदू रक्षक मित्र मंडळाचे सल्लागार दीपक पेटकर, दैनिक तरुण भारत संवाद वार्ताहार महेश कुलकर्णी, सचिन खंडागळे, विकास शिंदे, यांची उपस्थिती होती.
यावेळी या मुलांना घडविणारे प्रशिक्षक अनिकेत जांभळे, यांचा ही संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला..