crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:- पत्रकार भवन चौक येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीला सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून ८ तासात अटक….

सदर बझार पोलीस स्टेशन गु.र.क्र.१७३/२०२५ मा.न्या.स. ३१०(२).३ (५) प्रमाणे दाखल असुन यातील हकीकत अशी की दिनांक ०३/०३/२०२५ रोजी पहाटे ०५/१५ वा. चे सुमारास पत्रकार भवन चौक येथुन फिर्यादी हे टेम्पो क्र.एम.एच.४२ बी ९०६५ ने जात असताना ५ अनोळखी इसमांनी गाडी अडवुन थांबवुन फिर्यादी व ड्राईव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करुन १०,०००/-रु. रोख रक्कम फिर्यादीचे ड्राईव्हींग लायसन्स पॅनकार्ड व ४० ग्राम वजणाचे चांदीचे ब्रेसलेट असे रोख रक्कम व कागदपत्र जबरदस्तीने काढुन घेतला होता.

दि.०३/०३/२०२५ रोजी सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, सोमनाथ सुरवसे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशान भुमी येथे थांबलेले आहेत. अशी बातमी मिळताच आम्ही लागलीच मोदी स्मशान भुमी येथे मिळाले बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करता ५ इसम थांबलेले दिसले. बातमी प्रमाणे आमची खात्री झाल्याने आम्ही त्याला पकडण्यास त्याचे जवळ गेलो असता ते आम्हाला पाहुन पळू लागला त्याला थोड्याच अंतरावर पकडुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव १. मनोज सिताराम चलवादी, घर नं-१३८, श्यामा नगर, मोदी पोलीस लाईनच्या बाजुला, सोलापुर २. आकाश सदाशिव गड्डम, जय शंकर तालीम जवळ मोदी, सोलापुर ३. महेश राम भंडारे, घर नं-५९३ मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी सोलापुर ४. विनायक सिद्राम म्हेत्रे, वय १९ वर्ष, घर नं-१०८, मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी सोलापुर ५. जुएल जोसेफ दिनकर, वय २४ वर्ष, रा-घर क्र.६७,८५ गाळा, मोदी सोलापुर असे असल्याचे सांगीतले त्यांचेकडे दाखल गुन्हयाबाबत सखोल तपास करता त्यांनी दिनांक ०३/०३/२०२५ रोजी पहाटे ०५/१५ वा.चे सुमारास पत्रकार भवन चौक येथुन टेम्पो अडवुन त्यातील इसमांना मारहाण करुन रोख रक्कम व कागदपत्र जबरदस्तीने काढुन घेतल्याचे सांगुन गुन्हा केल्याचे कबुल केले.

सदर गुन्हयात वरील आरोपींना सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दि.०३/०३/२०२५ अटक केली आहे. अटक करुन १०० टक्के मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी दि. १८/०३/२०२५ पर्यंत न्यायालयीन कस्टडीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार सो., मा. पोलीस उप आयुक्त श्री विजय कबाडे सो, मा. सपोआ विभाग-२, श्री यशवंत गवारी सो, सदर बझार पोलीस ठाणे कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहा. फौजदार औदुबंर आटोळे, पोलीस हवालदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, संतोष पापडे, पोलीस शिपाई सागर गुंड, हणुमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, उमेश चव्हाण, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button