maharashtrapoliticalsocialsolapur

दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद….

कॉपी, गर्दी व अन्य कारणासाठी जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्र संवेदनशील.....

 

HTML img Tag Simply Easy Learning

जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील 184 परीक्षा केंद्रावर 65,585 विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देत आहेत

 

 

 

सोलापूर, दिनांक 4′- सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर राहिले आहेत. तरी दहावी व बारावीच्या उर्वरित पेपर साठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

 

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की दहावी बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने त्या तक्रारीचे तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेले आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेने विशेषत: शिक्षण विभागाने दहावी-बारावी च्या उर्वरित पेपर साठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचे आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यास जागेवरच निलंबित करावे तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

 

 

प्रत्येक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्या त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीच्या तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्र चालकांना बोलावून त्यांच्या केंद्रावर उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही याबाबत अत्यंत कठोरपणे निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी शिरपूर येथील परीक्षा केंद्रावर भेट देऊन तेथे कॉपी होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक तसेच केंद्र चालकावर त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील काही शाळावर कॉपी होत असल्याच्या तक्रारी आलेल्या असून त्याबाबत तपासणी करून पुढील कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दहावी बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील संवेदनशील केंद्र तसेच कॉपी होत असल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना माहिती देऊन संबंधित केंद्रावर अधिक भरारी पथके तसेच बैठे पथकांची नियुक्ती करण्याबाबत सूचित केले. तसेच पोलीस विभागांनी परीक्षा केंद्र परिसरात 1000 मीटर पर्यंत जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे त्याचे अत्यंत कठोर अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले.

 

 

 

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 184 परीक्षा केंद्रावर दहावी व बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू असून 76 परीक्षा केंद्र संवेदनशील असल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी सांगितले. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जिल्ह्यातील 65 हजार 585 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीचा माहिती तंत्रज्ञान पेपर बाकी असून दहावीचे गणित भाग एक व दोन व विज्ञान भाग एक व दोन असे चार पेपर बाकी असून या सर्व पेपर साठी अत्यंत दक्षपणे कार्यवाही करून परीक्षा सुरळीतपणे पार पाडली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच मास कॉपी करणाऱ्या व परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्रावर तसेच केंद्र चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

 

तर संबंधित पर्यवेक्षक यांना जागेवरच निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील नांदुरे येथील स्टार इंग्लिश स्कूलमध्ये तहसीलदार यांनी तपासणी केली असता फळ्यावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जात असल्याचे निर्देशनास आल्यानंतर संबंधित पर्यवेक्षक अमोल पवार व श्रीमती निपारे यांना त्याच दिवशी निलंबित करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button