maharashtrapoliticalsocialsolapur
आमदार श्री. देवेंद्र कोठे यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया…
ऐतिहासिक अर्थसंकल्प...

सोलापूर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला दिलासा दिलेला आहे. पगारदार, मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, कष्टकरी यांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प विकासाची नवी क्षितिजे गाठणारा ठरणार आहे. युवा उद्योजकांसाठी महत्त्वाचे असलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याचा निर्णय युवकांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राच्या माध्यमातून विकसित भारताकडे गतीने प्रवास करण्यासाठी हा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य