
सोलापूर, दि. २८ मे –
दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक व सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे माजी अध्यक्ष राजेंद्र मल्लिनाथ गोटे (वय ६८) यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी २९ मे रोजी सकाळी नऊ वाजता रूपाभवानी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी सून व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे ते उपाध्यक्ष होते.
——