maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी विद्यार्थी शहर कार्याध्यक्षपदी सत्यम जाधव…

सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी कार्याध्यक्षपदी सत्यम जाधव यांची निवड जाहीर केली त्या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते तर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार तौफिक भाई शेख प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे विद्यार्थ्यी शहर अध्यक्ष अनिकेत व्हसूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादांचे विचार सर्व समाज घटकापर्यंत पोहोचवण्याकरता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस काम करेल अशी आशा व्यक्त करत नुतन विद्यार्थ्यी कार्याध्यक्ष सत्यम जाधव यांना प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

यानंतर शाहरुख शेख यांची विद्यार्थ्यी शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

 

याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले विद्यार्थी शहर मध्य विधानसभा अध्यक्ष आलमेराज आबादीराजे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का महीला पदाधिकारी अर्चनाताई दुलंगे रुक्मिणीताई जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button