crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

नवी पेठेत दगडफेकीची अफवा, पोलिसांचा फौजफाटा तात्काळ नविपेठेत दाखल काही व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद काही काळ तणावाचे वातावरण…

शहरात दगडफेक अफवेच्या चर्चेला उधान...

सोलापूर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने SC/ST आरक्षणातील क्रीमी लेयर आणि उप-वर्गीकरणाबाबत दिलेला निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती-जमातींनी ने 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया यांच्या वतीने देखिल भारत बंदची हाक दिली होती. बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून नवी पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी नवी पेठ मध्ये दुकाने सर्व चालू होती परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणा बाजीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. दरम्यान नवी पेठ मध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे दगडफेक झाली आहे अशी अफवा सोलापूर शहरात पसरली परंतु तशी कोणतीही घटना नवी पेठ मध्ये घडली नाही.

BSP च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आपले म्हणणे प्रसार माध्यमांसमोर मांडले आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रवाना झालं. अदपूर्वी BSP चे राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड यानी आपली भुमिका विषद केली.

या दरम्यान काही काळ नवी पेठ मध्ये तणाव होता फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांची टीम तात्काळ घटना ठिकाणी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली आणि पुनश्च दुकान उघडत आपले दैनंदिन व्यापार सुरू केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button