सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे सुसंस्कृत नेतृत्व आ. विजयकुमार देशमुख यांनाच विजयी करा- राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार…
दमानी नगर परिसरात राष्ट्रवादीची महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ काॅर्नर सभा..

सोलापुर
महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दमानी नगर परिसरात काॅर्नर सभेचे आयोजन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस शामराव गांगर्डे यांनी केले होते…
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, आनंत जाधव,आनंद मुस्तारे,शशिकांत बापू कांबळे,प्रा.श्रीनिवास कोंडी आदींनी मनोगत व्यक्त केले …
महायुती सरकारने गेल्या दहा वर्षांत विविध योजनेच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून शहर उत्तर चा काया पालट केला आहे .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य केले आहे अनेक लोकप्रिय आणि लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात अमलात आणून जनविश्वास जिंकला आहे महायुतीच्या विकासात्मक कामामुळे विरोधकांची झोप उडाली असून विरोधक केवळ टीका करण आणि पोकळ आश्वासन देतायत मात्र मतदार जागरुक आहे महायुतीलाच मतदान करणार शहर उत्तरचे
उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या विकास कामांची मतदारांना कल्पना असून शहर उत्तर सह सोलापूर जिल्ह्यात प्रचंड त्यांची लोकप्रियता आहे.अतिशय शांत , विनम्र , सुसंस्कृत विकास रत्न अशी आमदार विजयकुमार देशमुख यांची विशेष ओळख आहे .
सर्व समाज घटकाला एकत्र पुढे नेत प्रत्येकाच्या सुख – दुःखात आमदार विजयकुमार देशमुख नेहमी अग्रेसर असल्याने एक स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे प्रामुख्याने पाहिल जात .त्यामुळे अशा कर्तृत्वान नेतृत्वाला विधान भवनात पुनश्च: काम करण्याची संधी देऊन सोलापूर शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी केले..
महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या मनोगतात विरोधक केवळ पोकळ आश्वासने देतात आपण न बोलता प्रत्यक्षात विकासावर भर देतो आणि याच कामाची पोचपावती म्हणून आपण मतदारांनी मला सलग चारवेळा लोकसेवेची संधी दिली आहे.विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केला आहे. देशात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर व सर्व सण उत्सव सामाजिक एकतेचा संदेश देत गुण्या – गोविंदाने साजरे करावे यासाठी मोदीजी नेहमी प्रयत्नशील असतात . याच समाज व्यवस्थेत बेताल वक्तव्य करून समाज व्यवस्थेला बाधा आणण्याचे काम विरोधक करतात असे देशमुख म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत आहे . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचा सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणला गेला .
सोलापूरचा कायापालट करण्यार चार वर्षात विशेष भर दिला गेला . त्यामुळे इथून पुढेही सोलापूरचा विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या आणि २० तारखेला विरोधकांना मत पेटीतून प्रतित्युर देऊन कमळाच्या चिन्हा समोरील २ नंबर बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा आणि आशीर्वाद द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी सभेत केलं ..
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, मा.नगरसेवक अनंत जाधव,सुनील खटके, संगीता जोगधनकर, चित्रा कदम,कांचन पवार,प्राजक्ता बागल,
शशिकांत बापू कांबळे,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे,
महेश निकंबे,अमीर शेख,प्रकाश झाडबुके,अनिल छत्रबंद,डॉ.संदीप माने,प्रकाश जाधव ,प्राजक्ता बागल कांचन पवार,महेश कुलकर्णी ,
इरफान शेख,रुपेश भोसले,
बसवराज कोळी,राजू बेळेनवरू,
अनिल बनसोडे,पवन पाटील,
वैभव गंगणे,सोमनाथ शिंदे, दत्तात्रय बनसोडे ,
समदानी मत्तेखाने,श्रीकांत वाघमारे,प्रदीप बाळशंकर
डॉ प्रवीण जाधव, डॉ हरिश्चंद्र गलीयाल डॉ. रुपाली चव्हाण, डॉ कैलास अनियपनवर ,प्रसाद मोळक ,रवी गायकवाड ,आकाश कांबळे, सिद्धेश्वर आंबट
लखन कारंडे,जगन्नाथ चव्हाण ,अमर दुधाळ , प्रवीण रामदास, आबा बरगंडे, मनोज पवार ,अशोक गलांडे, रंजीत कोकाटे, उमाकांत निकम, कैलास चौरे ,रेखा गायकवाड, सुदर्शना चव्हाण ,स्मिता नामदास ,जयमाला रजपूत ,अनिता गवळी , अँड. अमोल कोटीवाले, शत्रुघ्न माने, प्रज्ञासागर गायकवाड ,शरद येचे,संदेश नारायणे,किरण आवताडे, दिनेश पवार,सागर गव्हाणे,मौला शेख, मैनुद्दीन इनामदार ,विजय माने ,
राजू पवार ,शिरीष सर्वगोड ,प्रकाश घोडके ,विश्वनाथ कुलकर्णी,अरविंद माळी
श्रीकांत कनके ,जावेद शेख ,सिद्राम चीनकेरी ,विकास काकडे ,बिल्लू मणियार
शंकर पुजारी ,गणेश कोरे ,शशिकांत डोलारे,प्रकाश मोटे ,मलू अंगडी,संदीप पाटेकर ,शुभम काकडे ,नवाज हुंडेकरी सिद्धेश्वर गोकावी आदी उपस्थित होते …
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी केले.
यानंतर पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती अभियानाचा संदेश यावेळी देण्यात आला .
या सभेला परिसरातील स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला…