साऊथ आफ्रिका येथे झालेल्या अकराव्या कॉमनवेल्थ कराटे स्पर्धेत प्रथम आलेल्या भारतीय संघातील सोलापूरच्या कराटेपटूंच्या पाठीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कौतुकाची थाप …

सोलापूर
सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथे पार पडलेल्या अकराव्या काॅमनवेल्थ कराटे स्पर्धेत भारतीय संघात सोलापूर मधील रुद्र अॅकॅडमी ऑफ मार्शल आर्टस व योग संस्थेच्या भुवनेश्वरी सुरेश जाधव (एक सुवर्ण व दोन कास्य – वैयक्तिक व सांघिक), आर्या यादव (सुवर्ण, रौप्य – वैयक्तिक कुमिते व कास्य – टीम ), संकेत धन्नाईक ( सुवर्ण – टीम कुमिते व कास्य – वैयक्तिक), समिहान कुलकर्णी (सुवर्ण – टीम, कास्य – वैयक्तिक), अक्षिता कुलकर्णी (कास्य – वैयक्तिक ) व आदित्य पालिया (कास्य – टीम) या सहा कराटेपटूंचा पदके जिंकून भरघोस यश मिळाल्याबद्दल तसेच ज्युनिअर टीमचे कोच मिहिर जाधव यांचा उत्तम प्रशिक्षक म्हणून हार्दिक सत्कार केला.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांची विशेष उपस्थिती होती. रुद्र च्या संचालिका संगीता सुरेश जाधव, विजेत्या कराटेपटूंचे पालक व नगरसेवक अजित बनसोडे हे उपस्थित होते. विजेत्यांचे भरघोस कौतुक करुन जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी करुन पुढील कारकिर्दीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व कौतुकाची थाप दिली खूप छान खेळलात असेच खेळत रहा खूप मोठे व्हा भारताचे आणि सोलापूरचे नाव मोठे खरा सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून मी तुमच्यासोबत आहे कोणतीही शासकीय सहकार्य लागल्यास माझ्याकडे या मी तुम्हाला सहकार्य करेन असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सत्कार प्रसंगी ग्वाही दिली…
या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी सोमनाथ शिंदे व धन्नाईक, कुलकर्णी, यादव व पालिया आदी पालकवर्ग उपस्थित होते