आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने विनम्र अभिवादन….

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन लोककल्याणासाठी सतत कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे गतिमान चक्र सुरू ठेवण्यासाठी अतुलनीय योगदान देणारे तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला सक्षम करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने सात रस्ता येथील स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते महेश निकंबे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले अमर रहे अमर रहे यशवंतराव चव्हाण अमर रहे च्या घोषणा देत आदरांजली वाहण्यात आली…
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी आनंद मुस्तारे महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजय मोरे VJNT अध्यक्ष रुपेश भोसले डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. संदीप माने ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंध सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी सांस्कृतिक अध्यक्ष अशितोष नाटकर सोमनाथ शिंदे महिपती पवार प्रदीप बाळशंकर मुईज मुल्ला युवराज माने शामराव गांगर्डे प्रकाश झाडबुके प्रज्ञासागर गायकवाड अजिंक्य उपिन कांचन पवार प्रिया पवार संगीता घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते….