मालकांच्या विजयात “काकांचा”सिंहाचा वाटा ….
पानीवेस तालीम येथे आ.देशमुखांचा सत्कार...

सोलापूर
यंदाच्या निवडणुकीत शहर उत्तर मध्ये *”काटे की टक्कर”* पाहायला मिळत होती. मालकांच्या विजयासाठी भाजपसह घटक पक्षातील प्रमुख नेत्यांनी सर्वोतोपरी ताकद लावली होती.राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली आणि महायुतीला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. *”जोर का झटका हाय जोरोसे लगा”* अशी स्थिती महाविकास आघाडीची निर्माण झाली. आणि मतदारांचा पाऊस महायुती उमेदवारांवर पडला . महायुतीला मिळालेल्या जागांच्या आसपास देखील महाविकास आघाडीला बहुमत मिळवता आले नाही.विकासात्मक नेतृत्वाच्या पाठीशी मतदार राजा तटस्थ पणे उभा होता.आणि याचाच फायदा महायुतीला झाला .
यापैकीच एक नाव म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख.प्रचंड मताधिक्याने आ.देशमुखांचा विजय झाला .या विजया निमित्त पाणिवेस तालीमचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर यांच्या शुभहस्ते आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,माजी नगरसेवक विक्रांत { मुन्ना } वानकर , सुभाष पवार,महादेव { गोटू} पवार , प्रसाद झुंजे, पंकज काटकर , प्रतीक थोबडे, सिध्देश थोबडे,बिपिन धुम्मा, प्रसाद { आप्पा } पवार , प्रवीण खरात , योगेश चिंचोळी,अमित लाड , रविराज हरसुरे , अक्षय देवरे, केतन अंजिखाने, शुभम वाघदुर्गी, ओंकार पवार यांची उपस्थिती होती….