maharashtrapoliticalsocialsolapur

मूकपदयात्रेद्वारे धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांना आदरांजली

पुण्यतिथीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम : शेकडो हिंदू बांधवांचा सहभाग

 

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपति धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त बुधवारी मूकपदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे या मूकपदयात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते.

धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथून मूकपदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती. परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंखे यांच्या हस्ते शिवस्मारक येथे मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर मूकपदयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक राजकुमार पाटील, महादेव गवळी, सागर अतनुरे उपस्थित होते.

 

 

 

शिवस्मारकपासून निघालेली मूकपदयात्रा भागवत चाळ, पत्रा तालीम, श्री सळई मारुती मंदिर, वडार गल्ली, बाळीवेस, विजयी चौक, श्री शिवगंगा मंदिर, बलिदान चौक मार्गे महापालिका शाळा क्रमांक दोन जवळ विसर्जित झाली.

 

 

 

या ठिकाणी धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांना पुष्पहार घालून बलिदान दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी श्री संभाजीसूर्यह्रदय श्लोकमालिका सामूहिकरीत्या म्हणण्यात आली. यावेळी इतिहास व्याख्याते केदार केसकर यांनी ‘धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज बलिदान मास’ या विषयावर मार्गदर्शन केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia