maharashtrapoliticalsocialsolapur

देवेंद्र कोठेंना पाठिंबा देण्यासाठी एकवटला छोटी इरण्णा वस्ती परिसरातील मोची समाज…

मोनिका कोठे, किसन जाधव, नागेश गायकवाड यांनी साधला संवाद...

 

सोलापूर : प्रतिनिधी

शहर मध्य विधानसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ सोमवारी प्रभाग क्रमांक २२ मधील छोटी इरण्णा वस्ती येथे राबविण्यात आलेल्या होम टू होम प्रचारास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या परिसरातील मोची समाज उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटल्याचे दिसून आले. यावेळी मोनिका कोठे, संयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी नागरिकांशी संवाद साधत उमेदवार देवेंद्र कोठे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी रामवाडी, सोनी नगर, हुडको, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पत्रके देण्यात आली.

याप्रसंगी नागरिकांनीही देवेंद्र कोठे तरुण तडफदार उमेदवार असून त्यांच्याकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल, अशी आशा व्यक्त करत देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मोनिका कोठे, माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांना सांगितले.

याप्रसंगी रुक्मिणी जाधव, वैशाली गोली, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, करेप्पा जंगम, बाबू म्हेत्रे, मारेप्पा कंपल्ली, माजी नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली, अंबादास करगुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, गजू शिंदे, रेवण बुक्कानुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia