maharashtrapoliticalsocialsolapur

टकारी समाजाचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा…

 

सोलापूर : प्रतिनिधी

शहरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना सोमवारी टकारी समाजाने पाठिंबा दिला.

मोनिका कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील मान्यवरांच्या झालेल्या बैठकीत देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यावेळी टकारी समाजाचे ज्येष्ठ नेते गैबू जाधव आर.के.मामा गायकवाड,बसू गायकवाड,सुरेश जाधव ,पवन गायकवाड,टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद भाऊ जाधव,कार्याध्यक्ष पवन गायकवाड,युवक जिल्लाअध्यक्ष शिवाजी जाधव,राहुल जाधव, कामराज जाधव, प्रथमेश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, मारुती जाधव युवा नेता अंबादास जाधव व टकारी समाजातील जेष्ठ माता भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोनिका कोठे म्हणाल्या, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात टकारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाचे सोलापूरचे विकासात मोठे योगदान आहे. टकारी समाजाने पाठिंबा दिल्यामुळे आणखी बळ प्राप्त झाले आहे. टकारी समाज बांधवांसह सोलापूरकरांनी देवेंद्र कोठे यांना विजयी करावे, असे आवाहनही मोनिका कोठे यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी टकारी समाजाचे पदाधिकारी आणि टकारी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button