CCTV कॅमेरावरून कर्तव्य दक्षता दाखवत फौजदार चावडी पोलीसांनी लावला हरवलेल्या साडेतीन तोळे सोन्याच्या बॅगेचा शोध …
वृत्त सविस्तर

सोलापूर
शुक्रवारी खूपसिंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी महानंदा खुषास सावंत वय वर्षे ६५ हे त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी नवीन RTO ऑफीस सिध्देश्वर नगर येथून दुपार च्या सत्रात निघाले होते . सोलापूर बस स्थानक ला जाण्यासाठी त्यांनी रिक्षाने प्रवास केला होता.रिक्षा चालकाने
महानंदा सावंत व त्यांच्या पतीला बस स्थानकावर सोडले . यावेळी सावंत कुटुंबीयांकडे असलेली साडेतीन तोळे सोने असलेली बॅग रिक्षताच राहिली .हे सावंत यांना लवकर निदर्शनास आले नाही .त्यांनी बस स्थानक येथेच खूप शोधा शोध केली मात्र बॅगेचा पत्ताच लागेना .घाबरलेल्या अवस्थेत सावंत कुटुंबीय फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी हजर झाले यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असलेले फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अंमलदार रूपनर यांना महानंदा सावंत यांनी घडलेली हकीकत सांगितली.पोलीस अंमलदार रूपनर यांनी ही त्यांचे वरिष्ठ फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांना कळविली .तात्काळ क्षणाचा विलंब ही न लावता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या DB पथकास याबाबत कळवले . वरिष्ठांकडून घटनेची माहिती कळताच वेळेची तत्परता दाखवत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी सुधाकर माने ,अमोल खरटमल, सुरज सोनवलकर यांनी बस स्थानक येथील CCTV फुटेज वरून रिक्षाचा शोध घेतला . व संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेऊन रिक्षात असलेली साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग आपल्या ताब्यात घेतली . व तक्रारदार महानंदा सावंत यांना ही बॅग वरिष्ठांच्या हातून सुपूर्द केली. पोलिसांनी कर्तव्य दक्षता दाखवून हरवलेल्या बॅगेचा शोध लावून साडेतीन तोळे सोने असलेली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले . व रिक्षातून प्रवास करताना आपल्या कडील साहित्य संबंधित ठिकाणी उतरल्यानंतर काळजीपूर्वक हाताळावे असे आवाहन केले ….