दत्तात्रय बडगंची यांच्या प्रयत्नामुळे घरकुल भागातील महिलांच्या संसाराला हातभार…

सोलापूर
जुना विडी घरकुल येथे वयोश्री योजनेच्या शुभारंभ करत कामगार महिलांच्या 35 कुटुंबांना संसार उपयोगी 30 भांड्यांच्या सेटचे वाटप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांना मदत पोहोचवण्याचा धडाका लावला आहे.याचीच प्रेरणा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय बडगंची यांनी कामगार विभागाच्या सहकार्याने महिला कामगारांच्या 35 कुटुंबांना संसार उपयोगी भांड्याच्या सेटचे वाटप केलंय.
संसार उपयोगी साहित्याचे वाटप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे, राष्ट्रवादीचे आनंद मुस्तारे, सुहास कदम, जवाहर जाजू, महेश कुलकर्णी, वैभव गंगणे, प्रकाश ज्ञानपोगुल, व्यंकटेश कोलपॅक, व्यंकटेश अमूल आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विडी घरकुल परिसरातील महिला बांधव उपस्थित होते.