महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपी व वाहन ताब्यात २१ पोती हिरा गुटखा व वाहन असे एकुण ७,२६,०००/-रू चा मुद्देमाल हस्तगत…
मंद्रुप पोलीस ठाण्याची दमदार कामगीरी...

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपी व वाहन ताब्यात २१ पोती हिरा गुटखा व वाहन असे एकुण ७,२६,०००/-रू चा मुद्देमाल हस्तगत मंद्रुप पोलीस स्टेशची कामगीरी*
मा. पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण, श्री. अतुल कुलकर्णी यांनी सोलापुर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी सणउस्तव व विधानसभा निवडणुक चे अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्या बाबत आदेशीत केले होते.
पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने मंद्रुप पोलीस ठाणे नवनियुक्त राहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज पवार, यांनी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्या बाबत सुचना देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने दिनांक २४/०८/२०२४ रोजी रात्री पोकों / १०२१ रोहन पवार, पोकॉ/७७९ दिनेश पवार, पोकों/६३५ महांतेश मुळजे यांना पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलींग डयटी नेमण्यात आली होती सदर अंमलदार हे रात्रीचे सुमारास महामार्गावर सरकारी वाहनाने हायवे पेट्रोलींग करत असताना त्यांना बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली कि, एका वाहन विजापुर कडुन सोलापुर कडे अवैध गुटखा वाहतुक करीत येत असल्याची बातमी मिळताच सदर अंमलदार हे तात्काळ नांदणी टोल नाका येथे पहाटेचे सुमारास जावुन थाबले थोड्या वेळाने बातमीप्रमाणे सदरचे वाहन विजापुरचे दिशेने येत असल्याचे दिसले सदर वाहनास डयुटीवरील अंमलदार यांनी हाताचा इशारा करून थांबविले सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये २१ पांढ-या रंगाचे गोण्यामध्ये १२६०००/-रू किमंतीचा हिरवा गुटखा नावाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला मिळून आला वाहन चालक व त्यासोबत असलेल्या इसमास नांव गांव विचारता त्यांनी १) चालक, सोहेल मुर्तुज कुरेशी वय २३ वर्षे रा. कुरेशी गल्ली हजी माही चौक सोलापुर व त्याचा साथीदार २) अकील मोहम्मद सलीम शेख वय ३२ वर्षे, रा. जोडभावी पेठ मंगळवार बाजार सोलापुर असे असल्याचे सांगीतले सदर वाहन व मिळून आलेले दोन इसम यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन तात्काळ सहा. आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापुर यांना कळविण्यात आले त्याप्रमाणे अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे, यांनी सदर वाहनाची व त्यामधील प्रतिबंधीत हिरवा गुटखा मालाची तपासणी करून ६०००००/-रू किमंतीचे टाटा पंच एम.एच.१३ इ.सी.८३९३ ग्रे. कलर व १२६०००/-रू किमंतीचा हिवरा गुटखा असे एकुण ७,२६,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून वरील दोन इसमाविरूध्द मंदुप पोलीस ठाणेस अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीस न्याय संहीता कलम २२३, २७४, २७५, १२३ व अन्न सुरक्षा व मानदे का. कलम २६ (२), २६ (२) (i), २६(२) (ii) २६(२) (iv), २७ (३) (E), ३०(२) (A)
५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन आरोपी यांना गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयात हजर केले असता गुन्हयातील आरोपीतांना दिनांक २८/०८/२०२४ पर्यत ०४ दिवस पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री राजु डांगे, मंद्रुप पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरवी कामगीरी हि मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापुर विभाग श्री. संकेत देवळेकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज पवार, मंदूप पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, श्री. आर.एल. डांगे, पोलीस अंमलदार अंकुश मोरे, रोहन पवार, दिनेश पवार व महांतेश मुळजे यांनी बजावली आहे.
सोलापूरच्या पुण्यनगरीत प्रथमच महा कल्याणकारी अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन…