अक्कलकोट MIDC विकास कामांच्या विषयावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आक्रमक…
या विकास कामांचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांनाच :- काळजे...

सोलापूर
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना MIDC उद्योग व्यवसायास चालना मिळण्यासाठी निधीची तरतूद होण्याबाबत पाठ पुरावा केला होता.या निधीतील काही रक्कम ही सोलापूर महानगर पालिका व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिली जाणार होती.त्या निधीतून ड्रेनेज च्या कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.ते काम आता अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरच पूर्ण असे काळजे म्हणाले.त्यानंतर रस्ते , पथदिवे यासाठी ३० कोटींचा मंजूर करण्यात आले होते.त्यामुळे यातील ही २५ % अनुदान हे सोलापूर महानगरपालिका व जिल्हा नियोजन समितीनेच दिला होते.
त्यामुळे येथील विकास कामांसाठी मनीष काळजे यांच्या पाठपुराव्या नंतर प्राप्त झाला आणि विकास साधला गेल्याचा दावा काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केला. याच विकासाच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे . याच विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी आमदार श्रेय घेण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप मनीष काळजे यांनी केला आहे . याच विकास कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.यानंतर अक्कलकोट रोड MIDC परिसराचा कायापालट झाला असल्याचे काळजे म्हणाले . याचे पूर्ण श्रेय उद्योग मंत्री उदय सामंत,तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाईंनाच जाते.त्यांच्या नेतृत्वात आपण या परिसराचा विकास करू शकलो . अस असताना सध्याचे आमदार देवेंद्र कोठे कसे काय कामाचे श्रेय घेऊ शकतात ? असा संतप्त प्रश्न मनीष काळजे यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामाचे श्रेय घेऊ नये असे मनीष काळजे म्हणाले.या वरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मनीष काळजे यांच्या या आरोपा नंतर आमदार देवेंद्र कोठे काय प्रतिपादन करणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे…