ब्रेकींग:- बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कॉपी राइट चा गुन्हा दाखल…
हबीब व रंगरेज यांच्या विरोधात तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने...

कारवाईने व्यापार पेठेत चर्चेला उधाण…
या प्रकरणात हकीकत अशी की,दिनांक २२/०५/२०२५ रोजी यातील फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वय ४३ व्यवसाय खासगी नोकरी राहणार घर नंबर ११० मगिरीन बाई चाळ रामटेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्परेशन येथे गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ऑटो मोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार १०२ डी भवानी पेठ सोलापूर याने त्याच्या स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहाथ सापडला.तसेच पूजा ऑटो स्पेअर या दुकानातील हिरालाल रंगरेज याने ही स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी अश्याच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहाथ सापडले. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजीव रंगरेज यांच्या विरोधात रेवननाथ केकान यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
ठाणे अंमलदार महिला पोलीस hed कॉन्स्टेबल शेळके यांनी फिर्यादी केकान यांची तक्रार नोंदवून घेतली .त्यावरून फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम कॉपी राइट कायदा १९५७ कलम ५१,६३ नुसार गुन्हा दाखल केला.घटनास्थळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे – पाटील ,सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली.
व पुढे कारवाईचे आदेश दिले.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत…