maharashtrapoliticalsocialsolapur

महसूल विभाग, तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

शिबिराचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न...

📍 बाळे (सोलापूर)

HTML img Tag Simply Easy Learning

महसूल विभाग, तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते झाले.

 

 

 

या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे वाटप, नॉन-क्रीमिलेअर, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले देणे, अकृषिक (NA) परवानगी व मार्गदर्शन, सामाजिक योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी आदी सेवांचा समावेश होता.

 

 

 

तसेच भूसंपादन व अकृषिक प्रकरणांबाबत गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

यावेळी त्या प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी, संबंधित अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button