crimemaharashtrasocialsolapur

करमाळा पोलीस ठाणे ह‌द्दीत अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई कारवाईत एका महेंद्रा बोलेरो सह एकूणच ५ लाख ४७ हजार रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत….

दि. २६/०५/२०२५ रोजी पो.नि./ रणजीत माने यांना गोपणीय माहिती मिळाली की, केम ते वडशिवणे रोडने एक चारचाकी गाडी अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करीत येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अजित पाटील साहेब. उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून कारवाई करीता पो. हवा./१८४५ अलिममलिक शेख, पो.शि./२००७ अमोल घुगे व पो.शि./१३२९ प्रविण चव्हाण, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे यांना सुचना देवुन खाना केले. ते मौजे केम गावचे हद्दीतील वेताळबाबा मंदीराजवळ जावुन थांबले असता त्यांना एक चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडी येत असताना दिसली.

 

 

 

तीचा त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवुन गाडीची तपासणी केली असता त्यात एकुण ४७,०१४/- रु. किंमतीचे देशी-विदेशी दारुचे बॉक्स व त्यामध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या. तसेच सदर गाडीचे चालक सदाशिव अजय मराठे, वयः २८ वर्षे, रा. निमगाव (टें), ता. माढा, जि. सोलापूर यास तसेच अंदाजे ५,००,०००/- रु. किंमतीची एक महिंद्रा बोलेरो गाडी क्र. एम.एच.-४५/ए.क्यु.-४७५९ असा एकुण ५,४७,०१४/- रु. किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

 

ही कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील सो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. रणजीत माने, पो. हवा./१८४५ अलिममलिक शेख, पो.शि. / २००७ अमोल घुगे व पो.शि./१३२९ प्रविण चव्हाण, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button