सोलापूर शहर गुन्हे शाखेकडुन, ०३ आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक

सोलापुर शहरामध्ये दि.१५/०९/२०२४ व १६/०९/२०२४ रोजी पहाटेचे वेळी सलग दोन दिवशी घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्याचे अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी, तात्काळ घटनास्थळी भेट देवून, त्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा केले होते. त्याअनुषंगाने, घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घेणेत येत होता.
त्यानुसार, सपोनि/संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकास माहीती मिळाली की, संशयीत तीन इसम हे लाल काळया रंगाचे मोटार सायकलवर चोरी करण्याचे उद्देशाने कर्णीक नगर जवळ दबा धरून थांबलेले आहेत. त्याप्रमाणे सपोनि/संजय क्षिरसागर यांनी, बातमीचे ठिकाणी त्यांचे पथकासह तात्काळ जाऊन शिताफिने ०३ संशयीत इसम नामे ०१) राजासिंह आजादसिंह बडोले वय-२३ वर्ष, रा.घर नंबर ९८/१, मुक्काम उमरटी, पोस्ट- बडवाडी, वार्ड नंबर ०३, तालुका-वरला, जिल्हा बडवानी, राज्य मध्यप्रदेश, ०२) अवतारसिंह महुसिंह टाक वय-३१ वर्ष, रा. रा. मुक्काम उमरटी पोस्ट बडवाडी, तालुका-वरला, जिल्हा- बडवानी, राज्य-मध्यप्रदेश व ०३) कुलदीपसिंग जोतसिंग बडोले ऊर्फ भोंड वय-२९ वर्ष, रा. मुक्काम-सोरापाडा, पोस्ट- अक्कलकुवा, तालुका अक्कलकुवा, जि. नंदुरबार राज्य-महाराष्ट्र यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांचेकडे सखोल तपास केला असता, नमूद इसम हे पहाटेचे वेळी एका चोरीचे मोटार सायकलवर ट्रिपलसिट जाऊन घरफोडी व चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडून, सोलापूर शहरातील खालील प्रमाणे ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरीचा गुन्हा असे एकुण ०३ गुन्हे उघडकीस येवून, त्यामध्ये, एकुण ५४,१००/-रू किंमतीची मुद्देमाल व घरफोडी करयासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे.
१) जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर गु.र.नं. ५२४/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) २) जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर गु.र.नं.५२५/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३ (२)
३) एम आय डी सी पोलीस स्टेशन, सोलापूर शहर गु.र.नं.६६४/२०२४ भा. न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५, ६२
वर नमूद तिन्ही आरोपीविरूध्द, माहिती घेतली असता, ते आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून, त्यांचेविरूध्द दिल्ली व इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. वर नमूद तिन्ही आरोपी हे, सोलापूर शहरात दिनांक १४/०९/२०२४ रोजी, चोरी करणेचे उद्देशाने आले असून, ते एका लॉजवर राहत होते. त्यामुळे, सर्व लॉज मालकांना पोलीसांचे वतीने आवाहन करणेत येत आहे की, असे कोणी संशयीत/अनोळखी इसम लॉजवर राहणेस आल्यास, त्याबद्दल सोलापूर शहर पोलीसांना माहिती द्यावी.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./संजय क्षिरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, अनिल जाधव, अजय गुंड, कुमार शेळके, प्रविण शेळकंदे, चालक बाळु काळे यांनी केली आहे.