solapur

कायदेशिर कार्यकक्षा सोडून कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करणाऱ्या महिलेची याचिका फेटाळली – धाराशिव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय….

सोलापूर

 

सोलापूर – पतीसह सासरच्या सर्वांना गुंतवून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याद्वारे दरमहा तीस हजाराची पोटगी आणि वीस लाखांची नुकसान भरपाई मागणाऱ्या महिलेचा खटला धाराशिवचे न्यायदंडाधिकारी तसेच सत्र न्यायालयाने रद्द केला.
याची हकीगत अशी की, वास्तविक सोलापूर शहरात बाळे भागात राहणाऱ्या एका महिलेने ती तिच्या मुलांसह धाराशिव येथे रहात असल्याचे दाखवून धाराशिव येथील फौजदारी न्यायालयात तिचा सोलापूर येथे राहणारा पती, सासू, सासरे आणि नणंद यांना गुंतवून कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. वरील चौघेही त्या महिलेचा अतोनात कौटुंबिक हिंसाचार करीत जाच हाट व छळ करीत असल्याचे आरोप करून तिला पतीकडून दरमहा तीस हजार रुपयांची पोटगी आणि वरील चौघांकडून वीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्या महिलेने या फौजदारी याचिकेद्वारे न्यायालयास केली होती. महिलेचा पती,सासू, सासरे, नणंद यांनी सोलापूर येथील अ‍ॅड.आल्हाद अंदोरे आणि अ‍ॅड.अथर्व अंदोरे यांचेमार्फत त्या याचिकेस सक्त विरोध केला होता.

 

 

पतीसह चौघांची बाजू मांडताना अ‍ॅड.अंदोरे यांनी याचिकाकर्ती महिला तिच्या दोन मुलांसह सोलापुरात रहात असल्याचे विविध पुरावे देत कार्यकक्षेबाहेरील न्यायालयास कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा, तसेच सोलापूरहून धाराशिवला हेलपाटे पाडून आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या हेतूने खोटी केस केल्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी श्रीमती गवई तसेच अपीलात सत्र न्यायाधीश श्री.पोतदार या दोन्ही न्यायाधिशांनी महिलेची कौटुंबिक हिंसाचाराची याचिका फेटाळली.

 

 

यात याचिकाकर्त्या महिलेतर्फे अ‍ॅड.डी.एन. सोनवणे (धाराशिव) यांनी काम पाहिले. तर माहिलेच्या पती, सासू, सासरे, नणंदतर्फे अ‍ॅड. आल्हाद अंदोरे आणि अ‍ॅड. अथर्व अंदोरे (सोलापूर) यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa