solapur

एस टी कंडक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

 

सोलापूर:

 

एस. टी. कंडक्टर यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा केलेप्रकरणाच्या खटल्यात संजय दगडू पवार, वय-25 वर्षे,मौजे चौबे पिंपरी ता.माढा याची बार्शी येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.4/12/2010 रोजी फिर्यादी कंडक्टर म्हणून ड्युटी वरून कुर्डुवाडी ते वरवडे जात असताना एस टी बस मधील महिला लक्ष्मी पवार यांनी प्रवासीने ज्येष्ठ नागरिक असल्याचे कार्ड दाखवून अर्ध्या टिकटाची मागणी कंडक्टर कढे केली असता, त्यावेळेस फिर्यादी कंडक्टर ने अर्धे तिकिट देता येत नाही असे सांगितले. त्यावेळेस आरोपी व फिर्यादी मध्ये वाद झाला. एस टी मौजे चौभे पिंपरी येथील स्टॅन्ड वर आली असताना, आरोपीही खाली उतरले आणि जाताना तुला बघू असे म्हणून फिर्यादीचे केस ओढले. तदनंतर परत त्याच मार्गे एस टी जात असताना, संध्याकाळी 4.oo वाजता आरोपी हे चौभे पिंपरी या स्टॉप वरून गाडी मध्ये चडूनसदर महिला लक्ष्मी पवार व तिचा मुलगा संजय पवार यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली. अन्य प्रवासानी मध्यस्ती केलेमुळे आरोपी हे बस मधून उतरून गेले. तदनंतर फिर्यादी ने बस कुर्डुवाडी पोलीस स्टेशन येथे नेऊन आरोपी विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केली प्रकरणीसदर महिला लक्ष्मी पवार व तिचा मुलगा संजय पवार यांचे विरुध्द कुर्डुवाडी पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम 353,333,332,324,323,504,आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी पोलीसांनी तपास करुन आरोपी विरुध्द मे. न्यायालयामध्ये दोषारोप पत्र पाठविले होते. खटला सुरु असताना आरोपी लक्ष्मी पवार यांचे निधन झाले. तिचा मुलगा संजय पवार यांचे एकटे विरुद्ध खटला चालला. . सदर प्रकरणाची सुनावणी अति. सत्र .न्यायाधिश व्ही. एस मालकल्पट्टे रेड्डीयांचे समोर झाली. सदर प्रकरणी सरकारी वकील यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले व आरोपीच्या शिक्षेची मागणी केली. या उलट आरोपीच्या वकिलांनी अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. मिलिंद खुपसूरे, यांनी साक्षीदाराच्या जबाबातील विसंगती मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन, सरकार पक्षाने एकही नेत्रा साक्षीदार तपासाला नसल्याचे सांगून अनुषंगाने प्रभावी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन कोर्टाने आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. मिलिंद खुपसूरे,अॅड. देवदत्त बोरगावकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, व सरकारतर्फे अॅड. होटकर,अॅड. डी. डी. देशमुख यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa