बलात्कार प्रकरणी पोलिसांचा आरोपातून मुक्त करणेचा अहवाल फेटाळला,सराफ व्यापारी माणिक नारायणपेठकरची पोलिस उपअधीक्षकमार्फत पुढीलतपास करून 60 दिवसात अहवाल दाखल करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश….

सोलापूर
फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली व आरोपीविरुद्ध पुरावा मिळून येत नाही त्यामुळे सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर यास बलात्काराच्या आरोपातून मुक्त करावे असा संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलिस यांनी दाखल केलेला ब समरी अहवाल मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.सुरवसे सो यांनी फेटाळला आणि पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पुढील तपास करावा, फिर्यादीने दिलेले सर्व साक्षीपुरावे नोंदवावे आणि अहवाल 60 दिवसात दाखल करावा असा आदेश दिला.
यात हकिकत अशी की, पिडीता हि कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती.त्यावेळी पिडीता हि तिचे भावाला अंगठी खरेदी करिता आरोपी चे नारायणपेठकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने पिडीतेची खाजगी माहिती व व कोठून आला आहात अशी माहिती विचारली.त्यावेळी पिडितेने त्यास मी आँर्केस्टा कलाकार असून काम शोधत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने पिडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून पिडीतेसोबत सलगी वाढवली व पिडीतेचा मोबाईल नंबर मागून घेतला तदनंतर आरोपी हा पिडीतेसोबत फोनवरून बोलणं सुरु झाले पिडीता हि सोने खरेदी करण्यासाठी आरोपीचे दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पिडितेने आँनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली.
तदनंतर त्याचदिवशी आरोपीने पिडीतेस सांयकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सांयकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले. त्यामुळे पिडीता हि रिक्षाने बार्शी रोडवरील एका लाँजवर गेली त्याठिकाणी आरोपीने पिडीतेवर तिचे ईच्छेविरूध्द जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदुक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तुला ठार मारेल अशी धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पिडितेने सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर याच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायणपेठकर यास दि.31/5/2024 रोजी अटक केली होती.
पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध पुरावा मिळून येत नाही, फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, घटना घडली तेंव्हा ती घटनास्थळावर नव्हती,आरोपीही घटनास्थळावर नव्हता असा अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता.
यात मुळफिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी फिर्यादीने फिर्यादीत कथन केलेली घटना खरी असल्याचे दर्शविणारे पाच साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र व पोलिसानी सुरुवातीपासूनच आरोपीला मदत करण्यासाठी फिर्यादीला महिला सुधारगृहात डांबून ठेवल्याचे तसेच पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचे व पोलिसांनी फिर्यादीतर्फे आलेल्या साक्षीदारांचे जवाब नोंदविण्याचे टाळून फिर्यादीलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने पोलिसानी दाखल केलेला ब फायनल अंतिम अहवाल फेटाळला व 60 दिवसात फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यात मुळफिर्यादीतफे अँड. संतोष न्हावकर, अँड. राहुल रूपनर यांनी तर आरोपीतफे अँड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.



