solapur

सोलापुरात भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पहिले पाऊल : रोहिणी तडवळ आणि संजय कदम यांची बैठकीत चर्चा !…

सोलापूर

 

सोलापुरात भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी पडले आहे.
सोलापुरातील एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी पार पडलेल्या एका बैठकीत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी आपापल्या पक्षाची ज्या – त्या प्रभागात असलेली ताकद आणि उमेदवार याबाबत चर्चा केली. सर्वांसामान्य तोडगा काढण्यासाठी दोघेही योग्य पाऊल उचलतील असे ठरले.

 

 

राज्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून जोमाने काम करत असताना सोलापुरातसुद्धा महायुती झाली पाहिजे. त्यासाठी जागांच्या बाबतीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दोघांकडून पहिले पाऊल टाकण्यात आले.

 

 

यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील,साईनाथ अभंगराव, सचिन चव्हाण,लक्ष्मीकांत ठोगे पाटील,उत्तमप्रकाश खंदारे,
मनिष काळजे,भाजपचे शशी थोरात आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa