उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर देगाव येथे ज्येष्ठांचा सन्मान सोहळा आनंदी वातावरणात संपन्न…

सोलापूर
शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या ६१ व्या. वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण व महिला आघाडी उपशहर प्रमुख पूजा नवनाथ चव्हाण यांच्या वतीने हनुमान मंदिर देगाव प्रभाग क्रमांक ६ येथे ज्येष्ठांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा शिवाजीराव सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, जेष्ठ नेते सुरेश अण्णा कराळे , गिरीष कराळे, राजश्री दिंडोरे, चंद्रशेखर कराळे, यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला हिंदुहृदसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना झिंदाबाद , एकनाथ भाई शिंदे आप आगे बढो हम आपके साथ है च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
आपल्या मनोगतात शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत ,जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी नवनाथ चव्हाण व पूजा नवनाथ चव्हाण यांच्या कौतुकास्पद उपक्रमाचे विशेष कौतुक केले…
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा नवनाथ चव्हाण यांनी केले…