politicalsocialsolapur

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याचा विरोधात निषेध आंदोलन, सोलापूर मध्ये भारतीय जनता पार्टी शहर सोलापूर यांच्या वतीने…

सोलापूर

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान वॉशिंग्टन मधील जॉर्ज टाउन विद्यापीठ मध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारत देशात सामाजिक अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपविण्याचा विचार करेल असे दुटप्पी व कुटील भावना व्यक्त केली.

राहुल गांधी यांचे वक्तव्य घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे अपमान करणारे आहे त्यांच्या या संविधाना प्रति असलेल्या खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व अनुसूचित जाती मोर्चा कडून निषेध आंदोलन
*स्थळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोलापूर.*
*वेळ – सकाळी 10.00 वाजता दिनांक – 13 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले*

याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की लोकसभा निवडणूक दिशाभूल करणारे काँग्रेसचे चेहरे जनतेसमोर आले आहेत संविधान संपविणार आरक्षण संपवणार असे खोट्या वक्तव्य करून अप्रचार काँग्रेसने केला असे म्हणत या घटनेचे तीव्र निषेध केला.

आमदार विजयकुमार देशमुख मालक म्हणाले आज भाजपाच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे राहुल गांधी हे परदेशात जाऊन भारतीय संविधान व आरक्षण बद्दल अपमान जनक वक्तव्य करत आहेत जे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं त्याप्रमाणे भाजपा हा देश चालवीत असून आम्हाला संविधान बद्दल प्रचंड आदर आहे असे म्हणाले.

शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले आरक्षण पाठिंबा देणारी भारतीय जनता पार्टी आहे तसेच संविधानाला मजबूत करणारे भारतीय जनता पार्टी आहे राज्यघटना बदलणे किंवा आरक्षण रद्द करणे हे भाजपाचे विचार नसून लोकसभेत, असा अपप्रचार काँग्रेसने केला आणि त्यांच्या मनातील सत्य आज राहुल गांधी हे प्रदेशात जाऊन आणि सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करू असे सांगत आहेत त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे म्हणाले की काँग्रेस आणि त्यांच्या घराणे शाहीची नियती ही नेहमी संविधान विरोधी राहिले आहे *1961 साली जातीवर आधारित आरक्षण विकासात अडथळा ठरते असे विधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले, त्याचप्रमाणे 1985 साली आरक्षणाच्या नावावर बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन, असे विधान राजीव गांधी यांनी केले होते याचा धागा पकडत 2024 सली सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करू असे विधान राहुल गांधी यांनी केले*.

स्वातंत्र्यापासून काँग्रेसने जम्मू कश्मीर मध्ये एसी एसटी ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले काँग्रेस राज्यात स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठांमध्ये एसी एसटी ओबीसी घटकांना आरक्षण नाही हे खरे आणि कुटील डाव आहे असे विधान प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केले.

याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख मालक आमदार सुभाष बापू देशमुख शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे सरचिटणीस डॉक्टर नारायण बनसोडे रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड, राजाभाऊ माने मारेप्पा कंपली प्रवीण कांबळे महेश बनसोडे सुजित चौगुले श्रीनिवास करली संजय कोळी संतोष कदम जय साळुंखे बाबुराव संगेपाग रामभाऊ वकसे, अनिल कंदलगी सुनील गोडगाव संतोष कदम राजकुमार निकंबे जग कप्पा कांबळे अजित गाडेकर गौतम कसबे सुरेश मोरे बजरंग कुलकर्णी अर्जुन जाधव अक्षय अंजिखणे, सुधाकर नराल राजकुमार हंचाटे,अनंत गोडलोलू आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button