maharashtrapoliticalsocialsolapur
बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ च्या अध्यक्षपदी मेहुल भूरे यांची निवड …

सोलापूर
जुळे सोलापूर येथील श्रीशैल ( मामा ) हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचालित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जल्लोषात बाराव्या शतकातील आद्यसमाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
त्याकरिता यंदाच्या वर्षीच्या बसव जन्मोत्सव बाबत रविवारी 13 एप्रिल रोजी जुळे सोलापूर येथील बालाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या नियोजन आणि वार्षिक आढावा बैठकी प्रसंगी यंदाचे मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष म्हणून मेहुल भूरे,सचिव विश्वनाथ आमणे,उपाध्यक्ष राजेश शिवशक्ती,प्रविण स्वामी,कार्यअध्यक्ष लिंगराज ख्याड, पूजा प्रमूख गुरुनाथ अचलेरे,सह-सचिव बालाजी लाड, खजिनदार रविद्र आमणे यांच्यासह अन्य नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली.