देवस्थानच्या अध्यक्ष व सचिवास अटकपूर्व जामीन…

सोलापूर : येथील खंडोबा देवस्थान बाळे या ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनय विजय वेपे वय ४२ रा. बाळे सोलापूर व सचिव श्री. सागर चंद्रकांत पुजारी बय-३६ वर्षे रा.बाळे सोलापूर या दोघांना, त्यांनी अनाधिकाराने बँक व्यवहार हाताळून, एक जमिन खरेदीचा व्यवहार करुन, बेकायदेशीर कृत्य केल्या प्रकरणीच्या गुन्हयात दोघांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने, त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
यात हकीकत की, श्री क्षेत्र खंडोबा मंदीर बाळे हे चारशे वर्षापुर्वीचे देवस्थान असुन, सदर देवस्थान हे विश्वस्त कायद्याप्रमाणे नोंदणीकृत आहे, विश्वस्तांमार्फत सदर देवस्थानवा कारभार चालतो. देवस्थानचे एक पुजारी नामे सिद्राम रघुनाथ पुजारी रा. बाळे सोलापूर यांनी दि.१३/०९/२०२४ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली की, श्री. विनय ढेपे व श्री. सागर पुजारी हे दोघेही ट्रस्टचे अध्यक्ष व सेक्रेटरी नसताना, तसेच त्यांना बँक व्यवहार करण्याचा अधिकार नसताना, त्यांनी बँकेस एक पत्र देऊन, बँक व्यवहार करुन दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांसाठी एका जागेचा व्यवहार करुन, ट्रस्टच्या खात्यावरील रु.६६,७६,०६५/- इतकी रक्कम खर्च करुन देवस्थानची फसवणुक केली अशी तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सदर दाखल गुन्हयामुळे दोघांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयात अॅड. शशि कुलकर्णी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी सत्र न्यायालया समोर झाली, त्यामध्ये आरोपींचे पकील अॅड. शशि कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, श्री. विनय ढेपे व श्री. सागर पुजारी हे दोघेही सन २०१६ पासून पदाधिकारी आहेत, त्यांची निवड ही कायदेशीररित्या बोलावण्यात आलेल्या मिटींगमध्ये सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता होऊन झालेली आहे, त्याबाबत वेळोवेळी मा. धर्मादाय कार्यालयाकडे चेंज रिपोर्ट दाखल केलेले आहेत, बैंक खाते चालवणेचा त्यांना अधिकार आहे. तसेच जी जमीन खरेदी केलेली आहे, ती देवस्थानचे नावे खरेदी केलेली आहे, त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. त्यामुळे त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. तसेच कोणताही गुन्हा केलेला नाही. आरोपी तपासात सहकार्य करत आहेत. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन न्यायालायाने दोन्ही आरोपींना दर मंगळवारी सकाळी १० ते १२ या दरम्यान पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला,
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड, शशि कुलकणी, अॅड. अमरिश व्खोले, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. रणजीत चौधरी, अॅड. प्रणय उपाध्ये, व सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.