Super fast crime news :- स्नेहालय संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप शिंगवी सह अन्य दोघांवर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

सोलापूर
स्नेहालय संस्थेत पत्ता ( उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ) महिला समुपदेशन साठी जागा रिक्त असल्याची जाहिरात वृत्त पत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती.ही इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्यासाठी संस्थे मार्फत एक संपर्क क्रमांक जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला होता.या संपर्क क्रमांकावर पीडितेने संपर्क साधला तेव्हा तो फोन प्रदीप शिंगवी यांनी उचलला. व संस्थे बाबत पीडितेला फोनवरून माहिती दिली.आणि आपल्या संस्थेत जागा रिक्त असल्याचे सांगितले . त्या नंतर शिंगवी यांनी पीडितेस आपण इच्छुक असाल तर त्याच्या व्हॉट्सॲप वर फोटो व आधार कार्ड पाठवण्यास सांगितले.यानंतर पीडितेने त्यांचा फोटो व आधारकार्ड प्रदीप शिंगवी यांना व्हॉट्सॲप केले.पीडितेच्या व्हॉट्सॲप वरचा DP पाहून हा DP तुमचाच आहे का? अशी विचारणा शिंगवी यांनी पीडितेकडे केली.यानंतर पीडितेच्या कामाच्या अनुभवा विषयी शिंगवी यांनी चौकशी केली. यानंतर शिंगवी यांनी पीडितेला सातत्याने दोन ते तीन वेळा फोन केला.त्यावर पीडितेने आपण सिंगल असल्याचे सांगत त्यांना दोन मुली असल्याची कल्पना दिली.त्यावर शिंगवी यांनी पीडितेला तुम्ही तुमच्या मुला बाळासह येऊ शकता असे सांगितले . त्यानंतर प्रदीप शिंगवी हे पीडितेच्या चांगलेच मागे लागले . तुमच्या सारख्या सिंगल महिलांना आमची संस्था आधार देते असे सांगितले. व कोणतीही काळजी न करता आपल्यावर विश्वास ठेवू संस्थेत येण्याचा निर्णय घ्या असे म्हणाले .तुम्ही संस्थेत आल्यानंतर तुम्ही येथील १०० मुलींच्या आई बनणार आहात तेव्हा लवकर निर्णय घ्या अशी बळजबरी केली. विश्वास संपादन करून पीडितेला व त्यांच्या मुलीला प्रदीप शिंगवी यांनी संस्थेत अखेर आणलेच. पीडितेच्या मुलाखती वेळी प्रदीप शिंगवी यांच्या समवेत शिलवंती बिराजदार यांनी पीडितेला आपण संस्थेच्या व्यवस्थापिका असल्याची माहिती दिली. पीडितेने आपण १ डिसेंबर पासून संस्थेत काम करू असे शिंगवी व बिराजदार यांना सांगितले.त्यावर दोघांनीही पीडितेला तुम्हाला पंधरा दिवसाचा पगार आत्ताच देण्यात येईल तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा असे सांगितले.त्यावर पीडितेने तुम्ही मला १ तारखेचे अपॉईंटमेंट लेटर देण्याची मागणी केली . मागणीनुसार पीडितेला अपॉईंटमेंट लेटरची पूर्तता झाली नाही .यानंतर पीडिता या मुंबई ला निघून गेल्या. व दिनांक २९/१०/२०२४ रोजी पीडिता व त्यांची मुलगी सोलापूर ला आल्या. व स्नेहालय मध्ये पीडितीने आपल्या कामाला सुरुवात केली .संस्थेने पीडिता व त्यांच्या मुलीची राहण्याची व्यवस्था केली. काही दिवसात जातीवरून प्रदीप शिंगवी व शिलवंती बिराजदार यांच्या सोबत पीडितेचा वाद झाला. या वादाची ठिणगी स्नेहालयात चांगलीच पेटली. शिंगवी बिराजदार यांनी संस्थेतील रेखा गुप्ता यांना सांगून पीडितेचे खाणे – पिणे बंद केले. त्रास देण्यास सुरुवात केली . याची तक्रार पीडितेने प्रदीप शिंगवी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन प्रदीप शिंगवी यांच्याकडे केली .तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी बोलतो त्यांच्याशी असे सांगितले. व पीडितेला तुम्ही मला खूप आवडता असे सांगत अश्लील चाळे केले.यानंतर १८/०४ /२०२४ रोजी सकाळी १०:३० वा.सुमारास प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला ऑफिस मध्ये बोलावून घेतले . पुनश्च या ना त्या निमित्ताने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली . तुम्हाला जर अपॉईंटमेंट लेटर हवे असेल तर तुम्ही माझ्या सोबत शरीर संबंध ठेवा अशी मागणी पीडितेकडे केली . यानंतर पीडिता व शिंगवी यांच्या यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले .यानंतर दिनांक २५/११/२०२४ रोजी प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला पीडितेला ऑफिस मध्ये बोलावून घेऊन अपॉईंटमेंट लेटर देतो म्हणून पुनश्च: शारीरिक संबंध ठेवले. या कालावधीत पीडितेने आपल्या अपॉईंटमेंट लेटर ची विचारणा शिंगवी यांच्याकडे केली . तेव्हाही प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला अपॉईंटमेंट लेटर तयार करण्याचे काम सुरू आहे करून चालढकल करत लेटर देण्यास टाळाटाळ केली . या नंतर प्रदीप शिंगवी , शिलवंती बिराजदार व रेखा गुप्ता पीडितेला अपमानास्पद वागणूक देऊ लागले. आणि अखेर तर कहरच केला दिनांक ९/१/२०२५ रोजी पीडितेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेत काढून टाकण्याचे पत्र पीडितेला दिले. अपॉईंटमेंट लेटर चे आमिष दाखवून पीडितेसोबत सातत्याने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप शिंगवी आणि पीडितेला नाहक त्रास देणाऱ्या शिलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांच्या विरोधात पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.यानंतर सोलापूर तालुका पोलिसांनी प्रदीप शिंगवी, शिलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९ , अनुसूचित जाती – जमाती { अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम } अधिनियम १९८९ व भारतीय न्याय संहिता कलम BNS २०२३ ३(५) नुसार गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास सोलापूर तालुका पोलिसांकडून जलद गतीने करण्यात येतोय .