महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सव निमित्त श्री ओम साई मित्र मंडळाच्या वतीने निघणाऱ्या मिरवणुकीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या हस्ते शुभारंभ …
राष्ट्रवादी पुन्हा च्या गाण्यावर मिरवणुकीत पद्मशाली समाजातील युवकांचा जल्लोष...

सोलापूर
सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिनी महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सवा मोठ्या उत्साहात जल्लोषात निघत असतात अनेक मंडळाच्या मिरवणुकीसह लाखो भाविक या उत्सावात सहभाग नोंदवत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री ओम साई मित्र मंडळाच्या वतीने रथोत्सव निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचे शुभारंभ जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीस पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या भव्य अश्या मूर्तीस जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पद्मशाली समाज बांधवांना महर्षी मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचा मंडळाचे संस्थापक तुषार जक्का यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला …
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे,मंडळाचे नूतन अध्यक्ष:- निखिल जक्का धनराज दुडम अविनाश इंदापुरे श्रीनिवास दासरी अंबादास कुडक्याल यांची उपस्थिती होती…