crimemaharashtrasocialsolapur
दक्षिण सोलापूर मधील शंकर नगर परिसरात एस. टी. चा अपघात….
अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी...

सोलापूर
यात थोडक्यात अशी की वाहन क्रमांक MH 07 C 9591 ही बस कुसुर गावाकडून सोलापूर कडे मार्गस्थ होत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकर नगर परिसरात या बसचा खराब रस्त्यामुळे तोल जावून अपघात झाला .यामध्ये एस. टी बस महिला वाहकासह बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
सुवर्णा ढाले असे अपघातात जखमी झालेल्या महिला वाहकाचे नाव आहे.निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झालेल्या अपघाताबद्दल प्रवाश्यांनी व स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.आज किरकोळ अपघात झाला उद्या मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे….