अँटी रॅगिंग सप्ताह निमित्त वालचंद महाविद्यालयात ॲड.बाबसाहेब जाधव यांचे विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन….
रॅगिंग ही गोष्ट केव्हा कशी सुरू झाली? त्यासंबंधी भारतात व परदेशात वेगवेगळे कायदे केव्हा व कसे करण्यात आले?यावर ॲड.जाधव यांचे विशेष व्याख्यान...

अँटी रॅगिंग सप्ताह निमित्त वालचंद महाविद्यालयात व्याख्यान
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात अँटी रॅगिंग सप्ताह निमित्ताने फौजदारी कायद्याचे निष्णात वकील ॲड.बाबासाहेब जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ॲड. बाबासाहेब जाधव यांनी रॅगिंग म्हणजे काय? त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. रॅगिंग ही गोष्ट केव्हा कशी सुरू झाली? त्यासंबंधी भारतात व परदेशात वेगवेगळे कायदे केव्हा व कसे करण्यात आले? याचा आढावा श्री जाधव यांनी घेतला .
भारतात रॅगिंग विरोधात करण्यात आलेले विविध कायदे, या कायद्यान्वये वेगवेगळ्या रॅंकिंगच्या प्रकारांकरिता देण्यात येणाऱ्या शिक्षा त्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. रॅगिंग करणे हा एक मानसिक आजार असून त्यामुळे चेष्टा मस्करी करिता केल्या जाणाऱ्या गोष्टी अनेकदा आयुष्यभर पश्चाताप करायला लावतात .अनेकदा ज्याचे रॅगिंग होते तो नैराश्यामध्ये जाण्याची शक्यता असते. अपवादात्मक प्रसंगी मुले आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. या गुन्ह्यांमुळे केवळ रॅगिंग करणारा व त्याचे कुटुंबच नाही तर ज्याचे रॅगिंग झाले त्याचे कुटुंब असे दोघांचेही कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात अध्ययन अध्यापनाकडे आपले लक्ष केंद्रित करावे. एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रॅगिंग होत असेल तर वेळीच दिलेल्या सुविधा क्रमांकावर फोन करावा. आपल्या एखाद्या मित्रास असा त्रास दिला जात असेल तरीदेखील महाविद्यालयातील समितीकडे तक्रार करून वेळीच एखादी दुःखद घटना घडण्यापूर्वी ती थांबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अॅड. बाबासाहेब जाधव यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. माळी यांनी महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समिती कशा पद्धतीने काम करते, तसेच विद्यार्थ्यांनी निर्भय होऊन राहावे. कोणी एखाद्या प्रकारचा त्रास देत असेल तर वेळीच समितीकडे त्याची तक्रार करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. नागनाथ धायगोडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ .अंजना सोनवणे यांनी केले.