india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर जिल्हा कारागृहात महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप; आरोग्यविषयक समुपदेशन

सोलापूर

सामाजिक बांधीलकी जपत ‘वाव’ (WOW) या सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सर्व महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याबाबत महिला कैद्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी ‘वाव’ संस्थेच्या प्रतिनिधींनी महिला कैद्यांशी आत्मीयतेने संवाद साधत मासिक स्वच्छतेचे महत्त्व, योग्य स्वच्छता पद्धती आणि आरोग्याची काळजी याबाबत माहिती दिली.

 

या उपक्रमासाठी ‘वाव’ संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्यासह सायरा शेख, मारता असादे, पुष्पा हलकुडे, गौरा कोरे, कांचन चौगुले, लक्ष्मी माने आणि वैशाली देशपांडे यांनी सोलापूर जिल्हा कारागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून सॅनिटरी पॅडचे वाटप केले.

 

 

महिला कैद्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा आणि मासिक स्वच्छतेचा महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या संवेदनशील उपक्रमामुळे महिला कैद्यांना मोठा दिलासा मिळाला. सामाजिक बांधीलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महिला कैद्यांनी कौतुक करत ‘वाव’ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button