सृष्टी डांगरे यांची गुरुवारी दूरदर्शन वाहिनीवर मुलाखत
सामाजिक कार्याचा आढावा येणार प्रेक्षकांसमोर

सोलापूर : प्रतिनिधी
आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची विशेष मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत जय हो या कार्यक्रमात गुरुवारी १३ ऑगस्ट आणि शुक्रवारी १४ रोजी प्रसारित होणार आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजता ही मुलाखत प्रसारित होणार असून या मुलाखतीचे पुनर्प्रसारण शुक्रवारी दुपारी २ वाजता होणार आहे.
आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भक्कम पाठबळावर आणि आई फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव सामाजिक कार्य केले आहे. या सामाजिक कार्याचा आढावा या मुलाखतीतून घेण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि समीरा गुजर यांनी ही विशेष मुलाखत घेतली आहे.

वडील मोहन डांगरे यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे वाटचाल सुरू ठेवणाऱ्या आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची मुलाखत नागरिकांनी पहावी आणि आईशक्ती फाउंडेशनच्या सामाजिक कार्याविषयी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आईशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्यावी.



