Businessindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू

सोलापूर :

 

श्रवणदोष असलेल्या बालकांसह प्रौढ रुग्णांसाठी आशेचा नवा किरण ठरणारे सोलापुरातील पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर आधार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आले आहे.

डॉ. किशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कॉक्लिअर इम्प्लांट, श्रवणमूल्यांकन, ऑडिओलॉजी व स्पीच-लँग्वेज थेरपी यांसह कान, नाक व घशाशी संबंधित विविध आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

 

 

यासोबतच Obstructive Sleep Apnea (झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे) वरील शस्त्रक्रिया तसेच आवाजाच्या समस्या आणि स्वरयंत्राशी संबंधित आजारांसाठी Microlaryngeal Surgeries या अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

 

 

 

डॉ. किशन राठोड

विशेषतः लहान मुलांमधील गंभीर श्रवणदोषाचे लवकर निदान, योग्य वेळी कॉक्लिअर इम्प्लांट आणि त्यानंतरचे स्पीच-लँग्वेज रिहॅबिलिटेशन यावर भर दिला जाणार आहे.

या अत्याधुनिक सुविधांमुळे सोलापूर व परिसरातील रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. आधार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. किशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही सुविधा सोलापूरच्या आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण भर असून, रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button