बोरामणी तिहेरी खून प्रकरणी दोघांना जामीन मंजूर:-अॅड. संतोष न्हावकर

सोलापूर
बोरामनी येथील शेतीच्या वादातून व पैशाच्या कारणावरून झालेल्या तिहेरी खून प्रकरणातील आरोपी सचिन शिवाजी वाघमारे व सूरज महादेव मोरे यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा सो यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की, मुख्य आरोपी शंकर मस्के याचा भाऊ सुधाकर मस्के हा सुमारे 5 वर्षापुर्वी मयत झाला आहे तद्नंतर शंकर मस्के व त्याचा भाऊ सुधाकर मस्के याची पत्नी गायत्री यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमीन वाटणी वरुण वाद सुरू होता. त्यामुळे शंकर हा गायत्री हिच्या वर चिडून होता व तसेच गायत्रीच्या पतीने पूर्वी जमीन विकली होती त्या शेतजमीन विक्रीतून त्यांना मिळालेल्या रकमेतिल 25 लाख रुपये गायत्रीने दीर शंकर मस्के यास हातउसने रक्कम दिली होती ती रक्कम गायत्री ही शंकर यास मागणी करीत होती,त्यावेळी शंकर हा तिला घेतलेले पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत होता फिर्यादी हा अधून मधून गायत्री हिच्याकडे येत जात होता त्यावेळी याबाबत गायत्रीने फिर्यादीस सांगितले होते. दि.2/5/26 रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा गावात असताना त्याच्या गावातील पिंटू जाधव याने सांगितले की, तुझी बहीण गायत्री व तिचे दोन्ही मुलांना कोणीतरी ठार मारले आहे.
तूला काय माहिती मिळाली आहे काय, तू खात्री करून घे त्यामुळे फिर्यादीने गायत्री हिच्या मोबाईल वर फोन केला असता तिचा मोबाईल बंद लागत होता त्यामुळे शंकर मस्के यास फोन केला असता त्याचा देखील फोन बंद लागत होता त्यानंतर फिर्यादीने त्याच्या मावस भावाला फोन लावून विचारणा केली असता त्याने खरे असल्याचे सांगितले त्यामुळे फिर्यादी हा त्वरित सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आला असता त्यास चर्चेतून असे समजले की, शंकर ऊर्फ पपु मस्के याने त्याची बहीण गायत्री, भाची प्रियांका व भाचा शिवराज यांना तलवारीने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले असल्याची फिर्याद दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
प्रस्तुत गुन्ह्यात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्याने यातील अटक आरोपी सूरज मोरे व सचिन वाघमारे यांनी अॅड.संतोष न्हावकर यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना अॅड. संतोष न्हावकर यांनी, “फिर्याद दाखल करतेवेळी प्रस्तुत आरोपींनी मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पपु मस्के यास मदत केली असल्याचे व दोषारोपपत्र मध्ये मुख्य आरोपीस पळून जाण्यास मदत केली असल्याचा विसंगत पुरावा दाखवून पोलिसांनी ठोस पुरावा आणलेला नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.सदर चा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, अॅड. मीरा पाटील, अँड. शिवरत्न माने यांनी काम पाहिले.
,



