किरकोळ वादावरून चुलत सासू व चुलत जाऊ यांनी जबरदस्ती अश्विनी पवार यांना पाजले विषारी कीटकनाशकांचे औषध CNS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…
चुलत सासू व चुलत जाऊं विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

यात थोडक्यात हकीकत अशी की,अश्विनी किरण पवार वय २७ वर्षे रा.पवार वस्ती कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना दिनांक १६/०८/२०२४ रोजी दुपारी साधारण १२:३० वा. सुमारास राहत्या घरी भागीरथी राजाराम पवार { चुलत सासू } ,रोहिणी अमोगसिद्ध पवार { चुलत जाऊ } सायली अवधूत पवार { चुलत जाऊ } या तिघींनी काटकारस्थान रचून किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता भागीरथी राजाराम पवार { चुलत सासू } यांनी अश्विनी यांचे हात घट्ट धरले.रोहिणी अमोगसिद्ध पवार { चुलत जाऊ } सायली अवधूत पवार { चुलत जाऊ } या दोघींनी मिळून अश्विनी यांना मारून टाकण्याचा डावपेच रचत विषारी कीटनाशकांचे औषध जबरदस्ती पाजले.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ संदेश मनोहर लोखंडे { अश्विनी यांचे वडील } रां.उत्कर्ष नगर विजापूर रोड सोलापूर यांनी अश्विनी यांना उपचारासाठी CNS हॉस्पिटल मध्ये दाखल केले.त्यांच्यावर CNS हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत . अश्विनी किरण पवार यांना ICU मध्ये सध्या ठेवण्यात आले आहे.त्यांच्या डाव्या बाजूस छातीला जबर मार लागला आहे .
अश्विनी किरण पवार
त्यांच्यावर डॉक्टर शरद जाधव हे उपचार करत आहेत. याबाबत CNS हॉस्पिटल चे डॉक्टर सुहेल मणियार यांनी सोलापूर तालुका पोलिसांना याबत पत्रा द्वारे अधिकृत माहिती दिली. याचा अहवाल हॉस्पिटल प्रशासनाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी चव्हाण यांना दिला .
पुढील तपास पोलिस करीत आहेत.तर अश्विनी पवार यांच्या नातेवाईकांनी मुलीचा जीव घेण्याचे कट कार स्थान रचणाऱ्या भागीरथी राजाराम पवार { चुलत सासू } ,रोहिणी अमोगसिद्ध पवार { चुलत जाऊ } सायली अवधूत पवार { चुलत जाऊ } या तिघींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे . या घटनेनं मोहोळ तालुक्यात चर्चेला उधाण…