शहर गुन्हे शाखेकडून, मोटार सायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस…

फिर्यादी प्रभाकर अशोक चौगुले, वय ४१ वर्षे, रा. मु.मुढेवाडी, पो. गोठेवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापुर यांचा दुध विक्रीचा व्यवसाय आहे. दिनांक १५/०३/२०२५ रोजी, फिर्यादी है, सोलापूर शहरातील, जुनी मिल चाळ, येथे दुध विक्री करीता त्यांची मोटार सायकल घेवुन, आले होते. त्यावेळी, फिर्यादी यांनी, त्यांची मोटार सायकल पापय्या तालीम समोर, सार्वजनिक रोडलगत दुधाचे कॅन्डसह उभी करून, दुध देणेकरीता जुनी मिल चाळ या ठिकाणी पायी चालत गेले होते. त्यावेळी, कोणीतरी अज्ञात इसमाने, त्यांची मोटार सायकल दुधाचे कॅडसह चोरी केली होती. त्यानुसार, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं- १५६/२०२५ मा.न्या.सं.क. ३०३ (२) अन्वये मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.
त्याअनुषंगाने, गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने, सोलापुर शहरातील विविध ठिकाणांचे सि.सि.टी.व्ही. फुटेज व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे, दि.२९/०३/२०२५ रोजी, इसम नामे बापूराव श्रीमंत सोंडगे, वय ३८ वर्षे, रा.मु.पो. आष्टे, ता. मोहोळ, जि. सोलापुर यास, पुणे नाका, सोलापूर येथून ताब्यात घेतले, त्यानंतर, सदर इसमाकडे सखोल विचारपूस केली असता, त्याने, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले…
शहर गुन्हे शाखेने, इसम नामे बापूराव श्रीमंत सोंडगे याचे ताब्यातून, एकूण ९५,०००/-रूपये किंमतीचे ०४ मोटारसाकली जप्त करून, मोटार सायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगीरी मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि./ दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, वसिम शेख, सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड, यांनी केली आहे.