समाजकंटकांकडून सोलापुरात खोकलेआई देवीच्या मूर्तीला हात न लावता मंदिराची तोडफोड…
खाकी वर्दीतून पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन...

जय श्रीराम
घटनेचे कारण गुलदस्त्यात संबंधितांवर सदर बझर पोलीस ठाण्यात FIR दाखल…
सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकलेआई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेतील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तेथे शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकानी देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आतील भिंतसुद्धा फोडण्याचा प्रत्यन केला घडलेली घटना हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली . बहिरवाडे यांनी वास्तवदर्शी घटना बघितल्यानंतर प्रथम तेथील पुजाऱ्याचा शोध घेतला परंतु त्याचा पत्ता काही मिळलाच नाही बहिरवाडे यांचे सहकारी प्रशांत पवार यांना बोलवून घेऊन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना घटनेची माहिती कळवली.
पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनेची माहिती कळताच तात्काळ सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे घडलेल्या घटनेबाबत कल्पना दिली व त्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले . यानंतर मंदिर परिसरात स्वच्छ साफसफाई करून जसं पूर्वी दरवाजा होता व भिंत होती अगदी तसेच कारागिरांना बोलवून घेऊन पूर्ववत उभं केलं आणि खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले.
हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना सदर बझार ला घेऊन जाऊन समाज कंटाळावर FIR दाखल करण्यात आली. या घटनेत पोलिसांची विशेष सहाय्य मिळाल्याने सुधीर बहिरवाडे यांनी पोलिसांचे आभार प्रकट केले.
या घटनेचे कारण अद्याप गुलदस्त असून असे गैरवर्तन करून
समाजकंटकांना नेमके काय साध्य करायचे होते? हे समाजकंटक नेमके कोण आहेत याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे? चोरीच्या उद्देशाने ही घटना करायची होती तर जड दरवाजा घेऊन पळाले असते पण समाजकंटकांना हिंदु धर्मा विरोधात काय करायचे असले असते तर मूर्तीची विटंबना झाली असती त्यांनी मुर्तीला धक्का सुद्धा लावला नाही समाजकंटकांना या माध्यमातून हा काहीतरी वेगळाच संदेश त्यांना द्यायचा उद्देश होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जातात…
यापुढे मंदिरातील पुजारी व ट्रस्टीने आपली खबरदारी घ्यावी व सावधानता बाळगावी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आपल्या मंदिराची सुरक्षा घेणे खूप गरजेचे आहे असे मत सुधीर बहिरवाडे यांनी व्यक्त केले. या प्रकरणात
यावेळी मा.पोलीस उपायुक्त कबाडे पोलीस निरीक्षक मा.लकडे .
पोलीस उपनिरीक्षक मा. ढवळे साहेब यांचे सहकार्य लाभले.
असे आव्हान हिंदुमहासभा सोलापुर शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी केले आहे…
या घटनेबाबत सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय..