ब्रेकिंग:- सुधीर खरटमल यांनी ठोकला तुतारीला रामराम
अंतर्गत गटबाजीमुळ राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती..

सोलापूर
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आदेशानुसार राजकारणातील धुरंदर नेते सुधीर खरटमल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती . पक्ष संघटन वाढीसाठी ही निवड करण्यात आली होती. निवड प्रक्रियेपासून सहा महिन्याच्या कालावधीत या पक्षात अंतर्गत गडबाजी ला उधाण आलं होतं. याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या. वाद चव्हाट्यावर आल्याने अखेर या गडबाजीला कंटाळून रविवारी सुधीर खरटमल यांनी तुतारीला रामराम ठोकला. त्यांच्या या राजीनाम्यान राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आल आहे.
सुधीर खरडमल यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नेमके काय लिहिले? चला पाहू…
मा श्री. पवार साहेबांच्या आदेशान्वये माझी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सहा महिन्यांच्या कालावधी पक्ष संघटन वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पवार साहेबांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे मी मनःपूर्वक ऋणी राहील. आपल्या पक्षात अनेकांनी मला सहकार्य केलं त्यांचाही मी व्यक्तिशः ऋणी राहील.
पण मी आता या पदावर काम करू शकत नाही मी स्वइच्छेने राजीनामा देत आहे..
हे पत्र जरी लिहिले तरी माजी महापौर आणि सुधीर खरटमल यांचा वाद चव्हाट्यावर आल्यान त्या गटबाजीला कंटाळून खरटमल यांनी राजीनामा दिला. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून माजी महापौर महेश कोठे व सुधीर खरटमल यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती . त्याचा वाद विविध वृत्तपत्रातून वृत्तवाहिन्यातून प्रसारित झाला होता. वाद टोकाला पोहोचल्याने राजीनामा द्यावा लागला असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलाय…