समाजातील कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्कार व जिजाऊ स्वच्छता दूत पुरस्काराने विशेष सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी विभागाचा स्तुत्य उपक्रम….

सोलापूर
शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज सप्ताह निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून महिला आयोग अध्यक्ष तथा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी समाजातील कर्तृत्वान महिला व महिला सफाई कामगारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते .
सुरुवातीस व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक जोगधनकर साहेब व जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो अश्या घोषणानी राष्ट्रवादी भवन कार्यालय दणाणून सोडले होते..
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला. व्यासपीठावर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर,
दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम. इटकळे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,महिला आघाडी सचिव अर्चना दुलंगे,कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे,श्यामराव गांगर्डे , शहर उत्तर विधानसभा प्रकाश झाडबुके, राहुल सामल यांची उपस्थिती होती…
प्रास्ताविकात आयोजक संगीता जोगधनकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर सोलापूर निरीक्षक दिपालीताई पांढरे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामध्ये महिला आघाडी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून समाजामधील कर्तुत्वान महिलांचा शोध घेऊन तसेच स्वच्छता दूत यांची संपूर्ण माहिती घेऊन योग्य व्यक्तींचा सन्मान व्हावा आणि यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उज्वल भविष्यास हा सन्मान पुरस्काराचा उपक्रम राबवला आहे…
जिजाऊ सन्मान पुरस्कार कर्तुत्वान महिला
प्रा. डॉ. अंजना गायकवाड
डॉ. कांचन उकरांडे
डॉ. ललिता पेटकर
सुस्मिता संकल
सौ.वैशाली वाघ
सौ.लतिका साठे
सौ शोभा मोरे
सुजाता काकडे
कु प्रियंका जगझाप
निर्मला कांबळे
सुलभा जगझाप
मीनाक्षी जाधव
रश्मी मोहोळकर
जिजाऊ सन्मान पुरस्कार स्वच्छतादूत
वंदना थोरात
उषा चंदनशिवे
रेशमा चौधरी
वैशाली मोहन बनसोडे
दीपमाला सर्वगोड
दीपमाला आखाडे
पद्मा जमूल
नागम्मा मुनगल
शोभा अंबादास कापुरे
उषा सावंत
मायादेवी जाणवले
साखरा गायकवाड
रुक्मणी शिवशरण
शारदा लोखंडे
सुमन कांबळे
सोनाली भीमराव गायकवाड
वैशाली बनसोडे
नागरभाई बनसोडे
कुसम चंदनशिवे
मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी सत्कार मुर्तीना भगवे फेटे परिधान करण्यात आले होते.याप्रसंगी पुरस्कार प्राप्त ललिता पेठकर , अंजना राठोड , सुलभा जगझाप, अंजना गायकवाड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना संगीता ताई जोगधनकर यांनी प्रोत्साहन पर शाबासकीची थाप म्हणून या पुस्तकार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात शिवजयंती निमित्त व स्वराज सप्ताह निमित्त महिला आघाडी विभागांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्तुत्य अशा उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पुरस्कार प्राप्त कर्तृत्वान महिलांना शुभेच्छा दिल्या...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केल…..